इंडिया दर्पण डेस्क
पाकिस्तानला नमवल्यानंतर भारताच श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. भारत आणि श्रीलंका संघ आशिया चषकात पहिल्याच सामना पावसाने थांबवल्यानंतर तो पुन्हा सुरु झाला. भारताने ४९.१ षटकात सर्वबा २१३ धाव करुन श्रीलंकेला २१४ धावांचे आव्हान दिले होते. पण, श्रीलंकेने ४१ षटकात सर्व गडी गमावत १७२ धावा केल्या. भारताचा श्रीलंकेवर ४१ धावांनी हा विजय मिळवला. हा सामना जिंकुन भारत आता फायनल मध्ये गेला आहे. या सामन्यात कुलदीप यादव याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. रविंद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.
या सामन्यात पाऊस येण्याअगोदर भारताने ४७ ओव्हर्समध्ये ९ विकेट्स गमावून १९७ धावा केल्या होत्या. त्यावेळेस मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल दोघेही नाबाद खेळत होते. त्यानंतर सर्व खेळाडू बाद झाले. सोमवारी पाकीस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर आज भारत आणि श्रीलंका संघ आशिया चषकात पहिल्याच आमनेसामने आले.. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. काल ज्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान मध्ये सामना झाला त्याच मैदानावर हा सामना रंगला.
भारत -पाकिस्तान सामन्यात पावसाने व्यत्यत आणला होता. त्यामुळे या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर पुन्हा प्रेक्षकांचा हिरमोड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. ती पुन्हा खरी ठरली. कोलंबोमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे. आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. सतत पडत असलेल्या पावसामुळे खेळपट्टी आणि मैदानावर काय परिणाम झाला आहे.
आशिया चषकात भारत आणि श्रीलंका संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले. सुपर ४ लढतीत भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. तर श्रीलंका संघाने बांगलादेशला मात दिली होती. दोन्ही संघाचा आत्मविश्वास वाढलेला असतांना पावसाने व्यत्यय आणला. तरी भारताने हा सामना जिंकला.
या सामन्यात तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात भारतीय संघ उतरला. शार्दूल ठाकूर याला आराम देण्यात आला. कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा यांच्या जोडीला अक्षर पटेल याला स्थान देण्यात आले होते. भारतीय संघात इतर कोणताही बदल करण्यात आला नाही. दुसरीकडे श्रीलंका संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम ठेवला होता.
India’s resounding victory over Sri Lanka after defeating Pakistan