इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एका अपघातादरम्यान स्कॉर्पिओचालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी थेट महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारचाकी वाहनांचे दररोज अपघात होत असतात. त्यामध्ये कधी कुणाचा मृत्यू होतो तर कुणी जखमी होतो. अशा प्रकारच्या घटनांमध्ये ज्या कंपनीची गाडी आहे त्या कंपनीच्या प्रमुखावर गुन्हा दाखल करण्याची कधी ऐकिवात नाही. मात्र, उत्तर प्रदेशमधील एका अपघातप्रकरणी आनंद महिंद्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातावेळी स्कॉर्पिओची एअरबॅग ओपन न झाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्कॉर्पिओ कार सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उत्तम असल्याचं सांगण्यात आलं होतं, परंतु अपघातावेळी एअरबॅग ओपन न झाल्याने मुलाच्या मृत्यू झाला. त्यानंतर मृताच्या वडिलांनी महिंद्रा यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली होती.
अखेर कोर्टाच्या आदेशानंतर महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, मागच्या वर्षी यूपीची राजधानी लखनौत स्कॉर्पिओचा अपघात झाला होता. एअरबॅग ओपन न झाल्याने या घटनेत एका उच्चशिक्षित तरुणाचा मृत्यू झाला होता. महिंद्रा कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे मुलाचा जीव गेल्याचा आरोप करत फिर्यादीने कोर्टात धाव घेतली होती.
महिंद्रा यांच्या अडचणीत वाढ
अनेकवेळा सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहे. त्यानंतर कानपूर पोलिसांनी रायपुरवा पोलिस ठाण्यात आनंद महिंद्रा यांच्यासह १३ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. त्यामुळं आता महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांच्या कायदेशीर अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.
Anand Mahindra in trouble…a case has been registered in this case