अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर या खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात १०० कोटी रुपयाचा अब्रु नुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितल्यानंतर आता बच्चू कडू यांनी सुध्दा या वादात एंन्ट्री घेत थेट प्रहार केला आहे. त्यांनी या वक्तव्याची पोलिसात तक्रार करणार आहेत. पैसे वाटले, असे नवनीत राणांनी खुलेपणाने सांगितले. त्यामुळे चौकशी झाली पाहिजे असेही बच्चू कडू म्हणाले. यावेळी त्यांनी थेट फडवणीस यांच्यावर सुध्दा आरोप केला. आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभय असल्यामुळे ते काहीही वक्तव्य करतात असे ते म्हणाले.
राणा दाम्पत्याने गेल्या वर्षी दहीहंडीच्या कार्यक्रमात बच्चू कडू यांच्यावर आरोप केला होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद चांगलाच पेटला होता. राज्यभर या वादाची चर्चा होती. आता याच दहीहंडीच्या कार्यक्रमातून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर आरोप केला आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर यांनी थेट १०० कोटी रुपयाचा अब्रु नुकसानीचा दावा करणार आहे.
गेल्या काही दिवसापासून यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहे. त्यांच्यात व खासदार नवनीत राणा यांच्यात सध्या आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. त्यात आता आमदार ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्या विरुध्द कायदेशीर लढा देण्याचे संकेत दिले आहे. आमदार ठाकूर आक्रमक होण्याचे कारणही तसे ठरले आहे. खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून पैसे घेतले. मात्र प्रचार दुसऱ्याचा केला, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर आमदार ठाकूर यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला.
या आरोपाबद्दल बोलतांना त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणूकीच्या काळात जर मला पैसे दिले असतील तर त्याची माहिती निवडणूक आयोगाकडे नाही का ? एवढा मोठा आरोप झाल्यानंतरही राणा दांपत्यावर कारवाई का होत नाही ? ईडी, सीबीआय काय करत आहे ? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
अमरावतीच्या राजकारणात खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात अगोदर शिवसेना नंतर आमदार कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आता काँग्रेसच्या आमदार ठाकूर यांनी थेट अब्रु नुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले आहे. आता या दाव्यानंतर खा. राणा विरुध्द ठाकूर बरोबरच बच्चू कडू यांनी एंन्ट्री घेतली आहे. त्यामुळे अमरावतीचे राजकारण सध्या पैसे घेण्यावरुन तापले आहे.
Bachu Kadu’s antipathy directly in the dispute between Thakur and Navneet Rana,