इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री एकनाथ शिदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर अचानक दिल्लीला गेल्याचे कारण आता पुढे आले आहे. एक दोन दिवसात राज्याच्या पालकमंत्रीपदाची नवीन यादी जाहीर केली जाणार आहे. त्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दहा पालकमंत्रीपद देण्याचे निश्चित झाले आहे. पण, तीन जिल्ह्यावरुन रस्सीखेच सुरु आहे. त्यात पुणे येथील पालकंत्रीपद अजित पवार यांना देण्याबाबत संमती झाली आहे. पण, सातारा, रायगड नाशिक येथे मात्र रस्सीखेच सुरु आहे. या ठिकाणी शिंदे गटाने विरोध केला आहे. त्यामुळे महायुतीचे घोडं अडलं आहे. त्यामुळेच अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या असल्याचे बोलले जात आहे.
काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर होते. त्यामुळे त्यांची नाराजी स्पष्ट समोर आली. पण, प्रकृती अस्वस्थेचे कारण देत वेळ मारुन नेण्यात आली. पण, दुसरीकडे अजित पवार गटाच्या मंत्र्यांची बैठक त्यांच्या निवासस्थानी झाली. त्यामुळे महायुतीत काहीतर घडतं आहे, हे समोर येत होते. पण, कशावरुन हे मात्र कळत नव्हते. पण, आता पालकमंत्रीपदावरुन ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत सामील होऊन तीन महिने झाले. पण, त्यांच्या मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीचे तीन पक्षाचे सरकार असल्यामुळे अंतर्गत धुसफुस सुरु असल्याची अजूनही अनेक कारणे आहे. पण, ती अजून तरी पुढे आली नाही. पण, आता यातील एक कारण पुढे आले असून त्यात गेल्या काही दिवसापासून चर्चा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणपती दर्शनाला सर्व नेते गेले. पण, अजित पवार गेले नाही. त्यानंतर दोन्ही नेते ओबीसी बैठकीत एकत्र दिसले. त्यानंतर अजून एका रात्री झालेल्या बैठकीत हे नेते होते. यावेळेस पालकमंत्रीपदाची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे…