इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या आठवड्यात गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर गणपतीची मुर्ती विसर्जनासाठी नदी, तलाव व समुद्र या ठिकाणी गेलेल्या अनेक भाविकांचे मृत्यू झाल्याच्या घटना राज्यभरात घडल्या. गणेश विसर्जनाच्या दिवशी महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुमारे २४ जणांचे बळी गेले. इतकेच नव्हे तर गेल्या वर्षभरात विविध शहर आणि गावांमध्ये पोहण्यासाठी, सहलीसाठी व पर्यटनासाठी गेलेले, कपडे धुणे किंवा जनावरे धुण्यासाठी गेलेल्या अनेकांचे मृत्यू झाले. या घटना अलीकडच्या काळात वारंवार घडताना दिसतात. आता पुन्हा एकदा नगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यांमध्ये एका गावात अशीच दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे .एकाच कुटुंबातील तीन भावंडांचा दुर्दैवी तलावात बुडून मृत्यू झाला कपडे धुण्यासाठी गेले असतानाही दुर्घटना घडली या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आईला वाचवण्यात यश
जामखेड खर्डा येथे तीन भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. खर्डा येथून भुमकडे जाणाऱ्या शिर्डी हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गा लगत पाझर तलावावर आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुले व एक मुलगी गेली होती.दहावीत शिकणारा कृष्णा परमेश्वर सुरवसे (वय १६ ), दिपक ज्ञानेश्वर सुरवसे (वय १६ ) तर आठवीत शिक्षण घेत असलेली सानिया ज्ञानेश्वर सुरवसे (वय १४ ) अशी या भावंडांची नावे आहेत. यामध्ये सानिया आणि दिपक हे सख्खे भाऊ- बहिण आहेत.
सुरूवातीला पाय घसरून पडल्याने मुलगी पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी दोन्ही मुले पाण्यात उतरली. मात्र पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे ते देखील बुडू लागले. त्या तिघांना वाचवण्यासाठी मुलांची आई रुपाली ज्ञानेश्वर सुरवसे पाण्यात उतरली. मुलांना वाचवण्यासाठी तीने पाण्यात उडी मारली. त्यादेखील पाण्यात बुडत असतांना आजुबाजूला आसलेल्या लोकांनी मुलांच्या आईला वाचवण्यात यश मिळविले. मात्र या घटनेत तीनही बहीण भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला अत्यंत सुन्न करणाऱ्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर एकाच चितेवर तिन्ही भावंडांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
All the three siblings drowned under the eyes of the mother… cremation on the same pyre… an unfortunate incident in Nagar district