इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या विरोधातच आता अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात येण्याची शक्यता आहे. दावा ठोकणाऱ्यांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह माध्यमांमधीलही मोठ्या नावांचा समावेश आहे.
दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यातील सहभागाचे सबळ पुरावे उपलब्ध आहेत, तरीही कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात यावेत, अशी जनहीत याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच हस्तक्षेप याचिका दाखल करून आपले म्हणणे ऐकून घेण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
उच्च न्यायालयातील शपथपत्रांमध्ये खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच, याचिकाकर्ते आणि साक्षीदारांकडून उत्तर प्रदेशात केस दाखल करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, रिपब्लिकन टीवीचे अर्णब गोस्वामी, सुशांत सिंह राजपूत फॅन्स, प्रकरणातील साक्षीदार, तक्रारकर्ते या सर्वांचा समावेश आहे. आदित्य ठाकरेंविरुद्ध देशभर केसेस दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी सर्व प्रसार माध्यमांनांही न्यायप्रविष्ठ हत्येच्या प्रकरणाला आत्महत्या न संबोधण्याचे आवाहन केले आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत राशिद खान पठाण यांनी एक याचिका दाखल केली आहे. सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात ४४ वेळा फोनवर काय बोलणे झाले? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. या मूळ याचिकेनंतर आता प्रकरणांमध्ये भर पडत आहे.
१९ हजार ७० कोटी रुपयांचा दावा
या प्रकरणात मूळ याचिका दाखल करणारे राशिद खान पठाण यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंना १९ हजार ७० कोटी रुपयांची अब्रुनुकसानीची नोटीस धाडली आहे. एकूणच आदित्य यांना न्यायालयीन घेराव घालून अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांच्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
Aditya Thackeray in trouble in this case.. Now what will happen next?