अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पतसंस्थेचे कर्ज फेडण्यासााठी मुदत दिली, जमिनीवर जप्ती येऊ दिली नाही, लिलाव होऊ दिला नाही त्याच्या मोबदल्यात ७ हजाराची लाच घेतांना अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशनचे विशेष वसुली व विक्री अधिकारी यासिन नासर अरब हे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले. त्यांनी ३० रुपयाची लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोडी अंती २० हजार रुपयाची मागणी करून पहिला हप्ता म्हणून ७ हजार रुपये लाच रक्कम प्रथम स्वीकारण्याचे व पुढील दोन दिवसानंतर १३ हजार लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर तक्रारदार याने ७ हजाराची रक्कम फोन पेने यासिन यांना पाठवली व ते जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, हा सापळा ८ सप्टेंबरला रचला होता. पण, यासिन यांनी रोख स्वरूपात लाच स्वीकारली नाही. त्यांनी सदर लाच रक्कम फोन पे वर सेंड करण्यास सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी यासिन हे कार्यालयात हजर असताना ही सापळा कारवाई सुरु करण्यात आली. तक्रारदार याने फोन पे वरून ७ हजार रुपये लाच रक्कम आलोसे यांचे फोन पे वर सेंड केले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अरब यांना ताब्यात घेतले.
अशी केली कारवाई
तक्रारदार- पुरुष वय- 38 रा-भोरवाडी, ता- नगर जि.अहमदनगर
*आरोपी -यासिन नासर अरब, वय-42 वर्षे, विशेष वसुली व विक्री अधिकारी,
अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशन, अहमदनगर
*लाचेची मागणी-* 30,000/-₹
- ताडजोडी अंती 20,000/-₹
लाच स्विकारली 7000/- ₹ लाचेचा पहिला हप्ता म्हणून
हस्तगत रक्कम- 7000/-₹ आलोसे यांचे बँक अकाउंट वरून कायदेशीर प्रक्रियेद्वारे हस्तगत करत आहोत.
लाचेची मागणी – ता.08/09/2023
लाच स्विकारली -ता. 15/09/2023
*लाचेचे कारण -.तक्रारदार यांनी 2016 मध्ये भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, मर्या.केडगाव,अहमदनगर येथून 5,00,000/- कर्ज घेतले होते,सदर कर्ज घेते वेळी तक्रारदार यांनी त्यांच्या आई व मामाच्या नावे असलेली त्यांची भोरवाडी,ता.नगर शिवारातील शेत गट नं 499 मधील 1 हे.30 आर क्षेत्र जमीन तारण म्हणून दिली होती,
तक्रारदार यांना पतसंस्थे कडून सदर कर्जफेड करण्यासाठी 5 वर्षाची मुदत देण्यात आलेली होती,परंतु तक्रारदार मुदतीत कर्ज फेड करू शकले नाही,त्यामुळे सदर वसुली बाबत भैरवनाथ पतसंस्थेने सहायक निंबधक सहकारी संस्था,अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशन कडे पत्रव्यवहार केला होता,त्यानुसार सदर वसुली करण्यासाठी सहायक निबंधक सहकारी संस्था,अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशन ने दि.25/05/2023 रोजी सुनावणी ठेवली होती,सदर सुनावणीस तक्रारदार यांना हजर राहणे बाबत ची नोटीस प्राप्त होती,त्यानुसार तक्रारदार पण त्या ठिकाणी हजर होते,त्यादिवशी तक्रारदार यांनी फेडरेशनचे वसुली अधिकारी आलोसे अरब यांना कर्ज फेड करण्यासाठी 2 महिन्याची मुदत मागितली असता आलोसे यांनी तक्रारदार यांना तोंडी दोन महिन्याची मुदत वाढ दिली होती,त्यानंतर कर्ज फेड मुदतवाढीसाठी फी म्हणून दि.23/08/2023 रोजी 1000/-₹ फी मागितली असता तक्रारदार यांनी त्याच्या फोन पे ला 1000/-₹ फोन पे केले त्याबाबत तक्रारदार यांना कोणतीही शासकीय पावती दिली नाही,
त्यानंतर तक्रारदार यांनी दि.31/08/2023 रोजी भैरवनाथ पत संस्थेचे सर्व कर्ज फेड केले तसा पत संस्थेने कर्ज निल दाखला तक्रारदार यांना दिला होता,त्यानंतर दिनांक 04/09/2023 ते 07/09/2023 दरम्यान आलोसे अरब यांनी तक्रारदार यांना वारंवार मोबाईल कॉल करून मी तुला कर्ज फेड करण्यास मुदत दिली,तुझ्या जमिनीवर जप्ती येऊ दिली नाही,लिलाव होऊ दिला नाही तुला मदत केल्याच्या मोबदल्यात तू मला 30,000/-₹ दे, अशी लाच मागणी होत असले बाबतची तक्रार दि.07/09/2023 रोजी ला.प्र.वि. कार्यालय,अहमदनगर येथे तक्रारदार यांनी दिली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने पंचासमक्ष दि.07/09/2023 व दि.08/09/2023 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली असता आलोसे अरब यांनी तक्रारदार यांचे कडे 30,000/-₹ लाचेची मागणी करून तडजोडी अंती 20,000/- ₹ लाच मागणी करून पहिला हप्ता म्हणून 7000/-₹ लाच रक्कम प्रथम स्वीकारण्याचे व पुढील दोन दिवसानंतर 13000/-₹ लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले,
त्यानुसार दि.08/09/2023 रोजी सापळा आयोजित करण्यात आला असता आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडून नगद स्वरूपात लाच स्वीकारली नाही, त्यांनी सदर लाच रक्कम फोन पे वर सेंड करण्यास सांगितले होते. आज दि.15/09/2023 रोजी आलोसे अरब हे कार्यालयात हजर असताना सदर ची सापळा कारवाई आयोजित करून तक्रारदार यांचे फोन पे वरून 7000/-₹ लाच रक्कम आलोसे यांचे फोन पे वर सेंड करण्यात आली व आलोसे अरब यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कोतवाली पोलीस स्टेशन,अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
*सापळा अधिकारी – शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि.अहमदनगर
*सहायक सापळा अधिकारी- राजू आल्हाट, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर
*सापळा पथक:- पोलिस अंमलदार रमेश चौधरी, रविंद्र निमसे,सचिन सुद्रुक,वैभव पांढरे बाबासाहेब कराड
चालक पो हे कॉ. हरुन शेख,चालक पो.हे.कॉ. दशरथ लाड
*पर्यवेक्षण अधिकारी* प्रवीण लोखंडे,
पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. अहमदनगर
A bribe of 7 thousand on phone pay