नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चाळीसगाव बांधकाम उपविभागातील उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (५७) हे चार लाखाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले. क्लस्टर विकसित करण्याचे काम केलेल्या ठेकेदाराला ४ कोटी ८२ लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात लाचेची मागणी करून ४ लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारतांना ते रंगेहात पकडले गेले. ही कारवाई नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
या कारवाईबाबत सविस्तर माहिती देतांना एसीबीने सांगितले की, तक्रारदार यांनी डॉ . शामा प्रसाद मुखर्जी रुरबन’ या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग ,ता.चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा ता.चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते. सदर कामाची ४ कोटी ८२ लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात लाचेची मागणी करून ४ लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा असे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सांगितले.
अशी केली कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष
आलोसे– ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते ,वय 57 वर्षे, पद- उपविभागीय अभियंता, बांधकाम उपविभाग चाळीसगाव,
वर्ग-1, ता.चाळीसगाव , जिल्हा- जळगाव
पत्ता :- अशोक नगर, धुळे ता.जिल्हा धुळे
लाचेची मागणी रक्कम व दिनांक :- 5 लाख रुपये दिनांक 16/09/ 2023
लाच स्वीकारली रक्कम व दिनांक– 4 लाख रूपये दिनांक- 16/09/2023
*लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांनी डॉ . शामा प्रसाद मुखर्जी रुरबन’ या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग ,ता.चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा ता.चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते.सदर कामाची 4 कोटी 82 लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम 35 लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात लाचेची मागणी करून 4 लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून गुन्हा.
**आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी
सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई.
*सापळा अधिकारी
श्री स्वप्निल राजपूत ,पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मो.न. 9403234142/ 9371957195
*सापळा पथक-
पो.ना.प्रभाकर गवळी,
पो. ना. संदीप हांडगे,
पो. ना. किरण धुळे ,
पो. ना. अविनाश पवार
पो.ना.सुरेश चव्हाण, सर्व नेमणूक ला.प्र.वि. नाशिक .
Sub-Divisional Engineer found red-handed while accepting bribe of Rs.4 lakhs