नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सटाणा तालुक्यातील क-हे गाव येथे २० हजार रुपयाची लाच घेतांना तलाठी चंपालाल सुरेश चव्हाण हे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले. चव्हाण यांनी महसूल अभिलेखवर नाव लावण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचे कडे २१ ऑगस्ट रोजी पंचा समक्ष २० हजार रुपये लाचेची मागणी करून १५ सप्टेंबर रोजी सदर लाचेची रक्कम पंचांसमक्ष कऱ्हे गाव, ता. सटाणा येथे स्वीकारली.
या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडिलांनी त्यांच्या नावे असलेली शेतजमीन तक्रारदार व त्यांचा भाऊ यांचे नावे वाटणी करून दिली होती. सदर कागदपत्रे तक्रारदार यांनी तलाठी चव्हाण सजा रामतीर यांचे कडे शासकीय महसूली अभिलेखावर नावे लावणे करीता दिले होते. तलाठी चव्हाण यांनी महसूल अभिलेखवर नाव लावण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचे कडे २१ ऑगस्ट रोजी पंचा समक्ष २० हजार रुपये लाचेची मागणी करून आज सदर लाचेची रक्कम २० हजार रुपये पंचांसमक्ष कऱ्हे गाव, ता. सटाणा येथे स्वीकारली आहे.
अशी केली सापळा कारवाई
युनिट – नाशिक
तक्रारदार- पुरुष
आलोसे- चंपालाल सुरेश चव्हाण ,वय – 40 वर्ष, पद -तलाठी (सजा आराई, रामतीर )
,वर्ग -3, रा.श्रीकृष्ण नगर, सटाणा, जिल्हा – नाशिक.
लाचेची मागणी- 20,000/- रुपये दिनांक 21/08/2023
लाच स्विकारली-20,000/ – रुपये दिनांक 15/09/2023
हस्तगत रक्कम- 20,000/- रुपये
- लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचे वडिलांनी त्यांच्या नावे असलेली शेतजमीन तक्रारदार व त्यांचा भाऊ यांचे नावे वाटणी करून दिली होती. सदर कागदपत्रे तक्रारदार यांनी आलोसे चव्हाण तलाठी सजा रामतीर यांचे कडे शासकीय महसूली अभिलेखावर नावे लावणे करीता दिले होते. आलोसे चव्हाण यांनी महसूल अभिलेखवर नाव लावण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचे कडे दि. 21/ 08/2023 रोजी पंचा समक्ष 20000/- रुपये लाचेची मागणी करून आज दि. 15/09/2023 रोजी सदर लाचेची रक्कम 20000/- रुपये पंचांसमक्ष कऱ्हे गाव, ता. सटाणा येथे स्वीकारली आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा अधिकारी – गायत्री मधुकर जाधव
पोलिस निरीक्षक ,
,ला.प्र.वि. नाशिक. मोबा.नं. 7588516042.
सापळा पथक
पो. हवा. पंकज पळशीकर,
पो. हवा. अजय गरुड,
पो.ना. प्रकाश महाजन,
म पो. ना. ज्योती शार्दूल.
Talathi caught in ACB’s net while taking bribe of 20 thousand rupees in Satana taluka