नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड येथील सहकार अधिकारी राजेश शंकर ढवळे यांच्यावर एक लाखाची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारी अर्जाचा अहवाल बाजूने वरिष्ठांना पाठविण्यासाठी दीड लाखाची लाच मागितली. पण, नंतर एक लाखाची लाच तडजोडी अंती मागीतली म्हणून लाच लुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंध विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाचा अहवाल त्यांच्या बाजूने वरिष्ठांना पाठविण्यासाठी ढवळे यांनी त्यांचेकडे दीड लाख रुपयाची लाच मागणी करत असल्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे नोंदवली होती. त्यानुसार ६ सप्टेंबर २०२३ रोजी पंचा समक्ष लाच मागणीसंदर्भात पडताळणी करण्यात आली. त्यावेळी ढवळे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे एक लाख रूपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यासंदर्भात ९ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन, नाशिक येथे राजेश शंकर ढवळे यांच्या विरुद्ध भ्र.प्र अधिनियम कलम ७, ७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच मागणी अशी झाली कारवाई
युनिट – नासिक
तक्रारदार- पुरुष वय- 53 वर्ष,
*आरोपी – १) आलोसे राजेश शंकर ढवळे , सहकार अधिकारी, श्रेणी १, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, निफाड. जिल्हा नासिक रा. कृष्णा अपार्टमेंट, फ्लॅट न ९, चेतना नगर, नासिक ९.
*लाचेची मागणी-* 1,50,000/-₹
तडजोडी अंती लाचेची मागणी–* 1,00,000/-
लाचेची मागणी दिनांक– ता.6/9/2023
लाचेचे कारण – तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाचा अहवाल त्यांच्या बाजूने वरिष्ठांना पाठविण्यासाठी आलोसे हे त्यांचेकडे 1,50,000/- रुपयाची लाच मागणी करत असल्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नासिक येथे नोंदवली होती. त्यानुसार दि. 6/9/2023 रोजी पंचा समक्ष लाच मागणीसंदर्भात पडताळणी करण्यात आली असता आलोसे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 1,00,000/- रू लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यासंदर्भात आज दि.9/11/2023 रोजी मुंबई नाका पोलीस स्टेशन, नासिक येथे आलोसे यांच्या विरुद्ध भ्र.प्र अधिनियम कलम 7, 7(अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
*सापळा अधिकारी:-
अनिल बडगुजर, पो. उप. अधीक्षक, ला.प्र. वि. नासिक मो नंबर-: 8999962057.
*सापळा पथक – ,पोना दिपक पवार, पोशी संजय ठाकरे, पोना अविनाश पवार, चालक पोहवा संतोष गांगुर्डे सर्व नेमणूक लाप्रवि नासिक.पोना मनोज पाटील,तत्कालीन नेमणूक लाप्रवि नासिक.