इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – आम आदमी पार्टीचे पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचे अलीकडेच लग्न झाले. नवीन संसार सुरू झालाय. सध्या हे जोडपे सगळीकडे अभिनंदन आणि स्वागत स्वीकारत आहेत. अशात न्यायालयाने राघव चढ्ढा यांना बंगला रिकामा करण्याचे आदेश दिल्याने मोठा धक्का बसला आहे.
अर्थात राघव चढ्ढा यांना बंगला रिकामा करण्यास सांगितल्याने त्यांचा नवाकोरा संसार वगैरे उघड्यावर येणार नाही, पण लग्नाची चर्चा सुरू असताना घर रिकामे करण्याचे आदेश आल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे. राज्यसभा सचिवालयाने राघव चड्ढा यांना पूर्वी नवी दिल्लीत टाइप ७ बंगला दिला होता. परंतु, हा बंगला त्याच खासदारांना दिला जातो जे यापूर्वी केंद्रीय मंत्री झाले आहेत, ज्यांनी राज्यपालपद भूषवले आहे किंवा एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. राघव चड्ढा यांच्या बंगल्याचं प्रकरण पटियाला हाऊस कोर्टात पोहोचलं होतं.
यावेळी राज्यसभा सचिवालयाच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला की राघव चड्ढा हे राज्यसभेचे खासदार आहेत. नियमानुसार त्यांना टाइप ६ बंगला मिळायला हवा. तोच त्यांचा अधिकार आहे. टाइप ७ बंगल्यात राहण्याचा त्यांना अधिकार नाही. त्यानंतर सचिवालयाने त्यांना बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले. राघव चढ्ढ यांनी या आदेशांना पटियाला हाऊस कोर्टात आव्हान दिले. पटियाला हाऊस कोर्टाने मात्र आता त्यांना दणका दिला आहे. सरकारी बंगला रिकामा न केल्यामुळे त्यांना न्यायालयाने सुनावले आणि टाइप ७ बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत.
पहिले स्थगिती, नंतर…
पटियाला हाऊस कोर्टात गेल्यानंतर राघव चड्ढा यांना राज्यसभा सचिवालयाने बंगला रिकामा करण्याचे जे आदेश दिले होते, त्यावर स्थगिती दिली होती. आंदेशांवरील ही स्थगिती पटियाला हाऊस कोर्टाने आज हटवली आणि चड्ढा यांना बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले. तसेच राज्यसभा सचिवालयाने पाठवलेली नोटीस बरोबर असल्याचे म्हटले.
Raghav Chadha was ordered to vacate the bungalow…