इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उद्धव ठाकरे आज मुंब्रा येथील शाखेवरुन आता शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आमने सामने आले आहे. ही शाखा बुलडोझर लाऊन पाडल्यामुळे आज उध्दव ठाकरे येथे जाणार आहे. त्याअगोदरच दोन्ही गटात अगोदरच चांगली जुंपली आहे. उध्दव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडण्यात आल्यामुळे येथील वातावतरणही तापले आहे.
त्यातच राष्ट्रवादीचे नेते जिंतेद्र आव्हाड यांनी ट्विट करत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. मी स्वतः मुंब्रा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना भ्रमण ध्वनिवरून संपर्क करुन, उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मुंब्रा ते ठाणे या भागात लावलेले होर्डिंग्ज फाडण्यात येतील,अशी शंका व्यक्त केली होती. यावर त्यांनी, असे काहीही होणार नाही,आपण निश्चिंत रहा,आमची सर्वत्र नजर आहे,अस मला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले होते.
आज दूपारी उद्धव साहेबांचा ठाण्यात कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने हे होर्डिंग्ज शहरात लावलेले होते. यातील ९० टक्के होर्डिंग्ज आता फाडण्यात आले आहेत. मागील वर्षभरात आम्हाला असे अनेक अनुभव आलेले आहेत. एक होर्डिंग फाडायला किमान १५ मिनिट तरी लागतात.आणि “सर्वत्र नजर असणाऱ्या” पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही. आता पोलीस मला म्हणत आहेत की, उद्धव साहेबांना आम्ही मुंब्र्यात येऊच देणार नाहीत..!
असो, तरीदेखील मी मुंब्रा पोलीस स्टेशनचे आणि @ThaneCityPolice यांचे आभार मानतो.ते “त्यांची ड्युटी” मोठ्या निष्ठेने करत आहेत.
“मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है,जो मंजुरे खुदा होता हैं..!”