इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीमध्ये ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री सायरा बानो यांची भेट घेतली त्यानंतर पंतप्रधानांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत म्हटले आहे की, सायरा बानो जी यांना भेटून खूप छान वाटले. चित्रपट जगतातील त्यांच्या आद्य कार्याबद्दल पिढ्यानपिढ्या त्यांची प्रशंसा केली जाईल. आमच्या दोघात अनेक विषयांवर छान संवाद झाला.
सायरा बानोची अशी आहे कारकिर्द
१९६० आणि १९७० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. बानोला तिच्या संपूर्ण कारकिर्दीत चार फिल्मफेअर पुरस्कार नामांकन मिळाले. सारा बानोने १९६६ मध्ये अभिनेता दिलीप कुमारशी लग्न केले. या जोडप्याला मूलबाळ नव्हते. जंगली शागिर्द, दीवाना, सगीना, ब्लफ मास्टर, आयी मिलन की बेला, झुक गया आसमान, पडोसन, व्हिक्टोरिया नंबर २०३, हेरा फेरी यासह अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या आहे.
सायरा बानो अभिनेत्री नसीम बानो आणि निर्माता मियां एहसान-उल-हक यांची मुलगी आहे. त्यांची कारकिर्द मोठी असून त्यांची पंतप्रधांबरोबर ही भेट नेमकी कशासाठी होती हे मात्र पुढे आले नाही. कदाचित ही सदिच्छा भेट असल्याचेही बोलले जात आहे.