इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी आणि मानाची गदा हुकली; परंतु नाउमेद न होता वर्षभर प्रयत्न करून वाशीमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला दहा सेकंदाच्या चीत करत महाराष्ट्र केसरीचा बहुमान आणि मानाची गदा मिळवली.
बलदंड शरीर यष्टीच्या शिवराजला अवघ्या दहा सेकंदामध्ये सिंकदरने अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. गेल्या वर्षी अवघ्या महाराष्ट्राने महेंद्र गायकवाड याच्याकडून झालेला सिंकदरचा पराभव पाहिला होता; पण गडी खचला नाही. मागील वर्षीचा विजेता शिवराज राक्षे याला पराभूत विजयश्री मिळवली. माती विभागामध्ये झालेल्या उपांत्य लढतीतही सिकंदरने संदीप मोटे याचा १०-० ने पराभव करत एकतर्फी विजय मिळवला होता.
जालना येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने ९२ किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तर कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत सराव करणारा हा तुफानी मल्ल सलग दुसऱ्या वर्षी खुला गटात त्याने नशीब आजमावले होते. गेले वर्षभरापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घालणारा हा मल्ल महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आज विजयी झाला.