इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभेची निवडणूक रंगात असतांना राजस्थानमध्ये जयपुर येथे आयकर विभागाच्या छाप्यात कोट्यवधी रुपये सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार किरोडी मीणा यांनी गणपति प्लाज़ा मध्ये पेपर लिक प्रकरणात मिळालेला काळापैसा येथे लॅाकरमध्ये ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयकर विभागाने हा छापा १३ ऑक्टोंबरला टाकला होता. त्यानंतर हळूहळू यातील लॅाकर उघडले जात असून त्यात मोठ्या प्रमाणात ब्लॅकमणी व सोने मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.
१०० लॅाकर मध्ये ५० किलो सोने व ५०० कोटी रुपये काळेधन असल्याचा आरोप किरीड मीणा यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आज मी जे सांगितले ते खरे ठरले असल्याचे म्हटले आहे. ७ कोटी कॅश १२ किलो सोने आतापर्यंत मिळाले आहे. या प्लाझामध्ये ११०० लॅाकर आहे त्यात ५४० अॅक्टीव नाही. काही लॅाकर असे भी आहे त्याच्या मालकाचे नाव व पत्ता नाही. काही महत्त्वाची कागदपत्रही हाती लागली आहे. आयकर विभागाचा छाप्यात दोन लॅाकर कटरने कापले एकात लाखो रुपये रोख मिळाले. तर दुस-या लॅाकरमध्ये नोटांची गोणीच भेटली.
१३ ऑक्टोंबर आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यानंतर लॅाकर धारकांचा डेटा तयार केला गेला. २० ऑक्टोंबरला ८० लॅाकर धारकांना नोटीस जारी केली गेली. १७ ऑक्टोंबरला तीन लॅाकरमधून ३० लाख रुपये काढले गेले. २१ ऑक्टोंबरला २.४६ कोटी जप्त केले गेले. आतपर्यंत ७ कोटी रुपये कॅश व १२ किलोहून जास्त सोने जप्त केले गेले आहे.