इंडिाय दर्पण ऑलनाईन डेस्क
वातावरण निवळतीकडे तर पहाटेच्या गारव्याची शक्यता असल्याचे पुणे येथील आयएमडी निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. त्यांनी शनिवारपासून वातावरणात काय बदल होईल हे सांगतांना १७ नोव्हेंबर पासून मात्र महाराष्ट्रात हळूहळू थंडीची चाहूल लागू शकते अशी शक्यता वर्तवली आहे.
बघा माणिकराव खुळे काय म्हणतात….
१- उद्या शनिवार दि.११ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता असुन दुपारचे कमाल तापमान सामान्य राहून हळूहळू पहाटेच्या गारव्यात वाढ होवु शकते असे वाटते.
२- मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र उद्याही ढगाळ वातावरण असु शकते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग व कोल्हापूर अश्या तीन जिल्हात तर त्यापुढील पाच दिवसही म्हणजे गुरुवार दि.१६ नोव्हेंबर पर्यंतच ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता कायम आहे.
३- येत्या काळात अरबी समुद्र व बं. उपसागारात चक्रीय वाऱ्याची स्थितीतून जरी कमी दाब क्षेत्राच्या निर्मितीची शक्यता असली तरी महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात मात्र कोणत्याही प्रकारच्या पावसाची शक्यता जाणवत नाही. शुक्रवार दि.१७ नोव्हेंबर पासून मात्र महाराष्ट्रात हळूहळू थंडीची चाहूल लागू शकते असे वाटते.