नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मानुर येथे राहणा-या २७ वर्षीय तरूणाविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवत एकाने तरूणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला.
निलेश नामदेव माळोदे (रा. छत्रपती चौक मानूर पो. माडसांगवी ता.जि.नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत नाशिकरोड भागात राहणा-या पीडितेने तक्रार दाखल केली आहे. पीडित व संशयित एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात गेल्या जुलै महिन्यापासून प्रेमसंबध आहेत.
संशयिताने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी नाशिकरोड परिसरातील ठिकठिकाणी घेवून जात बलात्कार केला. तरूणीने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.