बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

धक्कादायक…देशभरातील रेल्वेशी संबधीत एक महिन्यातील गुन्हेगारी व अभियान….बघा त्यावर केलेली कारवाई

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 10, 2023 | 12:06 pm
in संमिश्र वार्ता
0
railway 1


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रेल्वे मालमत्तेचे, प्रवासी क्षेत्रांचे आणि प्रवाशांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेसाठी रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ ) सदैव कार्यरत आहे. प्रवाशांना सुखरूप, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी हे दल अविरत कार्यरत आहे. आरपीएफने ऑक्टोबर २०२३ मध्ये, प्रवाशांची सुखरूपता, सुरक्षितता आणि आरामदायकता यांच्या सुनिश्चितीसोबतच भारतीय रेल्वेला आपल्या ग्राहकांना विश्वासार्ह मालवाहतूक सेवा वितरीत करण्यात साहाय्य केले.

आरपीएफने प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाय करून आणि रेल्वे मालमत्तेसंदर्भात गुन्हा घडल्यावर त्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करत देशभर पसरलेल्या रेल्वेच्या प्रचंड मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. ऑक्‍टोबर 2023 महिन्‍यामध्‍ये आरपीएफच्‍या कामगिरीची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे –

‘नन्हें फरिश्ते’ मोहीम -हरवलेल्या मुलांची सुटका : ‘नन्हें फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 601 हून अधिक मुलांची आपल्या कुटुंबासमवेत भेट घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही मुले विविध कारणांमुळे आपल्या कुटुंबापासून विलग झाली होती. ती सुरक्षितपणे घरी परतण्याच्या सुनिश्चितीसाठी आरपीएफने निरंतर कार्य केले.

मानवी तस्करीविरोधी प्रयत्न (अभियान ‘आहट’) : भारतीय रेल्वेच्या विविध चौक्यांवरील आरपीएफच्या मानवी तस्करीविरोधी एककांनी (AHTUs-आहट) मानवी तस्करांच्या योजना निष्काम करण्यासाठी अथक प्रयत्न केले. ऑक्टोबर २०२३मध्ये, आरपीएफने तस्करांच्या तावडीतून ३९ व्यक्तींची सुटका केली.

अभियान ‘जीवन रक्षा’- प्राणांचे संरक्षण : रेल्वेगाडीमुळे खेचले गेलेल्या, तसेच फलाट आणि रेल्वे रुळांवर धोका निर्माण झालेल्या २६२ प्रवाशांचे प्राण, अभियान ‘जीवन रक्षा’ अंतर्गत आरपीएफच्या सतर्क आणि जलद कृतीमुळे, ऑक्टोबर २०२३ मध्ये बचावले.

महिला प्रवाशांचे सक्षमीकरण – “मेरी सहेली” उपक्रम: महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा विषय आरपीएफ गांभीर्याने घेत असून त्यासाठी “मेरी सहेली” उपक्रम सुरू केला आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये, २३२ “मेरी सहेली” पथकांनी १३,६६४ गाड्यांमध्ये जात ४२३,८०३ महिला प्रवाशांना सुरक्षेची हमी दिली. आरपीएफने महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये आढळलेल्या ५,७२२ व्यक्तींवर कारवाई केली.

दलालांवर कडक कारवाई ( “उपलब्ध” मोहीम ): दलालांविरुद्धच्या लढाईत, आरपीएफने ऑक्टोबर २०२३ मध्ये ४९० व्यक्तींना अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार वैध कारवाई केली. शिवाय ४२ बेकायदेशीर सॉफ्टवेअरसह ४३.९६ लाख रुपये किमतीची तिकिटे जप्त केली.

मोहीम ‘नार्कोज’- अमली पदार्थांसंदर्भातल्या गुन्ह्यांविरोधात लढा : आपल्या स्तुत्य प्रयत्नात आरपीएफने ऑक्टोबर २०२३ मध्ये ९९ व्यक्तींना अटक केली आणि ५.९९ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या गुन्हेगारांना अधिकारप्राप्त संस्थांकडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी सुपूर्द करण्यात आले.

प्रवाशांच्या तक्रारींवर जलद प्रतिसाद: आरपीएफने रेल्वे मदत (Rail Madad Portal) पोर्टल आणि हेल्पलाइन ( आणीबाणी प्रतिसाद मदत प्रणाली क्र. ११२ सह एकत्रित क्र १३९) द्वारे प्रवाशांच्या सुरक्षा-संबंधित तक्रारींचे त्वरित निराकरण केले. ऑक्टोबर २०२३ मध्ये ३०,३०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांचे निराकरण करण्यासाठी आरपीएफने आवश्यक पावले उचलली.

अभियान ‘यात्री सुरक्षा’– प्रवाशांचे संरक्षण : रेल्वे प्रवाशांवरील गुन्हे रोखण्यासाठी आणि त्यांचा छडा लावण्यासाठी आरपीएफ पोलिसांना साहाय्य करते. प्रवाशांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये हात असलेल्या २५६ गुन्हेगारांना आरपीएफने ऑक्टोबर २०२३ मध्ये अटक केली आणि त्यांना संबंधित जीआरपी /पोलिसांकडे सुपूर्द केले.

‘ऑपरेशन संरक्षा’ च्या माध्यमातून सुरक्षिततेची सुनिश्चिती : प्रवासी सुरक्षा आणि रेल्वे सेवांचे संरक्षण करण्यासाठीच्या दृढनिश्चयी प्रयत्नांमध्ये आरपीएफने, ऑक्टोबर २०२३ मध्ये धावत्या गाड्यांवर दगडफेकीच्या धोकादायक कृत्यात हात असलेल्या ३३ व्यक्तींना अटक केली.

गरजूंना मदत करणे (अभियान सेवा): मानवतावादी दृष्टीकोनातून, आरपीएफने ऑक्टोबर २०२३ मध्ये २७२ वृद्ध, आजारी किंवा जखमी प्रवाशांना त्यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान मदत दिली.

बेकायदेशीर माल वाहतुकीला आळा घालणे (अभियान सतर्क ): अभियान सतर्क अंतर्गत आरपीएफने १०,३३,१४९ रुपये किमतीची अवैध तंबाखूजन्य उत्पादने आणि २६,१२,६५६ रुपयांची अवैध दारू जप्त करत १२७ व्यक्तींना ताब्यात घेतले. या व्यक्तींना संबंधित कायदा अंमलबजावणी संस्थांच्या ताब्यात देण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सीबीआयचे रेल्वे कर्मचा-याच्या घरांवर छापे… मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक या ठिकाणी कारवाई…हे आहे कारण

Next Post

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई…नाशिकमध्ये दोन ठिकाणी छापे…पनीरचा मोठा साठा जप्त

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

T202509096027
महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची केली हवाई पाहणी…इतक्या कोटींची आर्थिक मदत जाहीर

सप्टेंबर 10, 2025
C.P. Radhakrishnan Honble Governor of Maharashtra 1 1024x1024 1
संमिश्र वार्ता

महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदावर….मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या अशा शुभेच्छा

सप्टेंबर 10, 2025
Untitled 4
महत्त्वाच्या बातम्या

नेपाळची सत्ता लष्कराच्या हातात…पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतली मंत्रिमंडळ समितीची बैठक

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250909 WA0433 1
स्थानिक बातम्या

कसमादे गौरव पुरस्कार जाहीर…शनिवारी यांचा होणार गौरव

सप्टेंबर 10, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कामे अर्धवट सोडू नये, जाणून घ्या, बुधवार, १० सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 9, 2025
Gyj9FwXXMAAG8KV
महत्त्वाच्या बातम्या

उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विजयी…पडली इतकी मते

सप्टेंबर 9, 2025
‘नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित 2 1024x757 1
संमिश्र वार्ता

राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इतके कोटी रुपये जमा

सप्टेंबर 9, 2025
IMG 20250909 WA0402 1
स्थानिक बातम्या

आज नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री फडणीस…इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबचे उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Next Post
IMG 20231110 WA0248 e1699599487779

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई…नाशिकमध्ये दोन ठिकाणी छापे…पनीरचा मोठा साठा जप्त

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011