इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – वांद्रे वरळी सी लिंकवर झालेल्या विचित्र अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. टोल नाक्यावर रांगेत उभ्य़ा असलेल्या गांड्यांना मागून आलेल्या भरधाव गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात ९ जण जखमी झाले आहे. एका इनोव्हा चालकाने सुसाट गाडी चालवित सहा गाड्यांना धडक दिली. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री हा अपघात झाला.
या अपघातात हनिफ पिर, हमाबीबी पिर, खतीया हटिया या तिघांचा मृत्यू झाला. तर असीम सदर, हजरा सदर, बीबी सदर, राजश्री दवे, राकेश दवे अशी जखमींची नावे आहे. अद्याप सर्व जखमींची नावे कळू शकलेलली नाही. या अपघातात नऊ जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींपैकी एका व्यक्तीला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर पाच जणांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली आहे. सर्व गाड्या वरळीहून वांद्र्याच्या दिशेने जात होत्या. अपघात करणारा चालकही जखमी आहे.
या अपघातानंतर घटनास्थळी तातडीने पाच रुग्णावाहिका दाखल झाल्या. त्यानंतर त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. आले. त्यामुळे जखमींचे प्राण वाचू शकले. धडक देणारा कार चालक गुजरातमधील ४५ वर्षीय व्यक्ती असून त्याला अटक करण्यात आली आहे.