इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
फूड सेफ्टी कायद्यांतर्गत दरवर्षी परवाने नूतनीकरण करण्याच्या निर्णयामुळे खाद्यपदार्थ निर्माते व विक्रेते यांच्यामध्ये फार मोठा असंतोष निर्माण झाला होता. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने केंद्र सरकारकडे, विशेषता फूड सेफ्टी विभाग व केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्याकडे याविषयी सातत्याने पाठपुरावा करून खाद्यपदार्थांचे परवाने किमान पाच वर्ष मुदतीसाठी नूतनीकरण करण्याचे आदेश देण्याची विनंती केली होती. सदर प्रयत्नांना यश आले असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ललित गांधी यांनी दिली.
फूड सेफ्टी विभागाने खाद्यपदार्थांच्या परवाने पाच वर्षासाठी नूतनीकरण करता येतील. असे आदेश ८ नोव्हेंबर २०२३ च्या परिपत्रका द्वारे जारी केले आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सोबत या विषयासाठी प्रयत्न करणाऱ्या अन्य सर्व संस्थांना धन्यवाद असे गांधी यांनी सांगितले.
फूड सेफ्टी कायद्यांतर्गत दरवर्षी नूतनीकरण करण्याच्या निर्णयामुळे खाद्यपदार्थ निर्माते व विक्रेतांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.