मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरुवारी सायंकाळी उशिराने तिरुपती येथे सहपरिवार आगमन झाले. यावेळी त्यांनी प्रथम तिरूचनुर येथे जाऊन श्री पद्मावती अम्मा मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.
यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून सत्कार केला. मुख्यमंत्री दोन दिवस सातारा दौ-यात त्यांच्या मुळ गावी गेले होते. आता ते देवदर्शनासाठी गेले आहे.
अनेक राजकीय नेते दिवाळीत देवदर्शन जात असतात. पण, दिवाळीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी तिरुपताली जाऊन देवदर्शन सहकुटुंब घेतले. काही दिवसापूर्वीच उध्दव ठाकरे सहकुटुंब केदारनाथला देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवदर्शनाला गेले.