इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ट्वीट करत आदित्य एल-1 मोहिमेतंर्गत पाठवण्यात आलेल्या अंतराळ याना बद्दल माहिती दिली आहे. आदित्य एल १ ने पृथ्वीपासून ९.२ लाख किलोमीटरचे अंतर पार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता सन पॉईंट एल-1 चा मार्ग शोधत आहे. पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर अंतराळयान पाठवण्यात इस्रोला सलग दुसऱ्यांदा यश आले आहे. याआधी मार्स ऑर्बिटर मिशन (मंगलयान) मध्ये पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर पहिल्यांदा यान पाठवण्यात इस्रोला यश आले होते.
१९ सप्टेंबर रोजी इस्रोने आदित्य एल-1 हा सूर्य आणि लॅरेंज पॉईंट 1 च्या दिशेने पुढे सरकल्याची माहिती दिली होती. आदित्यला आता अंतराळात ११० दिवस प्रवास करायचा आहे. त्यानंतरच आदित्य हा एल-1 पॉईंटवर पोहचणार आहे. आदित्य-L1 वरून सूर्याचे पहिले चित्र फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये मिळणार आहे.
इस्रोने केलेल्या व्टीटमध्ये म्हटले आहे, यानाने पृथ्वीपासून ९.२ लाख किलोमीटर अंतर पार करून, पृथ्वीच्या प्रभावाच्या कक्षेतून यशस्वीपणे बाहेर पडून प्रवास केला आहे. ते आता सूर्य-पृथ्वी लॅग्रेंज पॉइंट 1 (L1) च्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. मार्स ऑर्बिटर मिशन ही पहिलीच वेळ आहे की ISRO पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर अंतराळयान पाठवू शकण्याची सलग दुसरी वेळ आहे.