इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ओबीसी बांधवासाठी राबविण्यात येणाऱ्या मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन २०२३ ते २०२६ पर्यंत नाशिक जिल्ह्याला एकूण २३ हजार १७७ इतका लक्षांक प्राप्त झाला आहे. सदर घरकुलांसाठी गरजू व पात्र लाभार्थ्यांकडून तात्काळ परिपूर्ण प्रस्ताव मागवून शासनाने दिलेला लक्षांक पूर्ण करावा अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत.
राज्यातील ओबीसी बांधवाना घरकुल मिळावे यासाठी राज्यात मोदी आवास घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांसाठी नाशिक जिल्ह्याला एकूण २३ हजार १७७ इतका लक्षांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोर गरीब ओबीसी बांधवाना या योजनेचा लाभ मिळून पक्के घर मिळणार आहे.
मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन २०२३-२४, २०२४-२५ व सन २०२५-२६ साठी लक्षांक प्राप्त झाला आहे. यामध्ये येवला तालुक्यासाठी १८७६, निफाड तालुक्यासाठी २४५०, नांदगाव तालुक्यासाठी ४५०९, बागलाण तालुक्यासाठी २९५३, चांदवड तालुक्यासाठी १११३, देवळा तालुक्यासाठी ११५८, दिंडोरी तालुक्यासाठी ५६७, इगतपुरी तालुक्यासाठी १८४६, कळवण तालुक्यासाठी ९४०, मालेगाव तालुक्यासाठी ३५८८, नाशिक तालुक्यासाठी २८५, पेठ तालुक्यासाठी २, सिन्नर तालुक्यासाठी १८७५, सुरगाणा तालुक्यासाठी १, त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी १४ असा एकूण २३ हजार १७७ एवढा लक्षांक प्राप्त झाला आहे.