नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३ लाख ६५ हजाराच्या ऐवज चोरुन नेला. राजीवनगर भागात ही घरफोडी झाली. यात सोन्याचांदीचे दागिणे चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलेश सुर्यकांत मर्गज (रा.श्रेया रेसि.वैभव कॉलनी,सुमन पेट्रोल पंपामागे राजीवनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मर्गज कुटुंबिय मंगळवारी (दि.७) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे ३ लाख ६४ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- २६ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चेतनानगर येथील सोनवणे मळा भागात घडली. चेतन संतोष साळुंखे (रा.प्रकाश सोनवणे यांच्या घरात चेतनानगर) असे मृत युवकाचे नाव आहे. राहणा-यासदर तरूणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चेतन संतोष साळुंखे (रा.प्रकाश सोनवणे यांच्या घरात चेतनानगर) असे मृत युवकाचे नाव आहे. चेतन साळुंखे याने बुधवारी (दि.८) आपल्या राहत्या घराजवळील मंडपाच्या गोडावून मध्ये छताच्या लोखंडी अँगलला कपडा बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत तुषार साळुंखे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार येळवे करीत आहेत.