नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासन रंगयुक्त मसाले उत्पादकावर धाड टाकत लाखोंचा मसाला व मिरची जप्त केली. जिल्ह्यात दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर भेसळयुक्त अन्न पदार्थांवर कार्यवाही घेण्याबाबतची मोहिम सुरु आहे. या मोहिमेत मालेगाव येथील मे… SEA-MA मसाले प्रॉडक्ट प्रा.लि. या ठिकाणी अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी धाड टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी मिर्ची व मसालेचे उत्पादन सुरु होते. त्याठिकाणी मिर्ची व मसाल्यामध्ये कायद्याप्रमाणे रंग वापरण्यास बंदी असूनही त्याठिकाणी synthetic food color preprationहा खाद्य रंग साठविलेला आढळून आला.
या कारवाईबाबत देशमुख यांनी सांगितले की, सदर रंगाचा वापर अन्न व्यवसायीकाने टिका फ्राय मसाला व मिर्ची पावडर मध्ये केला असल्याचा दाट संशयावरुन १. टिका फ्राय मसाला ८०० पॅकिट किंमत रक्कम रुपये २४ हजार, २. मिरची पावडर कुठल्याही लेबल नसलेल्या गनी बॅग मध्ये ५३८ किलो किंमत रक्कम रुपये १ लाख ६१ हजार ४०० रुपये व घटना स्थळी synthetic food color prepration हा भेसळकारी पदार्थ साठा ८.५० किलो किंमत रक्कम रुपये ७४० इतकाचा साठा भेसळीच्या संशयावरुन अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत नमुने घेऊन जप्त केला.
सदर प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषकास पाठविण्यात येत असून अहवाल आल्यावर नियमानुसार पुढील कार्यवाही घेण्यात येईल. सदरची कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी केली.