इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भोपाळः पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असतांना त्यात आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी सुध्दा घडत आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. त्यांनी चौहान यांना कंसमामा असल्याचे विशेषणही बहाल केले.
चित्रकूट येथे काँग्रेसचे उमेदवार निलांशु चतुर्वेदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळेस प्रियंका गांधीनी जोरदार टीका केली. मोदी यांनी संसदेच्या सुशोभीकरणावर वीस हजार कोटी रुपये खर्च केले; पण थकबाकीचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. मोदीजी म्हणतात, की काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षात काहीही केले नाही यावरही प्रियंका गांधी यांनी उत्तर दिले.
यावेळी त्या म्हणाल्या की बाराशे ते चौदाशे रुपयांना सिलिंडर मिळत असल्याची माहिती कोणी मोदीजींना देईल का? लोक शिवराज सिंहांना प्रॉब्लेम सांगतात, तेव्हा शिवराज म्हणतात, की मी तुझा मामा आहे. काळजी करू नकोस. राज्यात दररोज १७ महिलांचे शोषण होत आहे. तेव्हा हे कंसमामा काय करतात?
यावेळी पंतप्रधांन मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. दरम्यान, मोदी यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, की भ्रष्टाचाराचा काळा पैसा मी थांबवला तर ते शिव्या देतील की नाही. मी दुकान बंद केले.