इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा आरक्षणाबाबतएकीकडे सरकारच्या जोरदार हालचाली सुरु असतांना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या तिस-या टप्यातील दौरा जाहीर केला. या तिस-या टप्यात ते नऊ दिवस राज्यभर फिरणार असून मराठा समाजाच्या गाठीभेटी ते घेणार आहे. १५ नोव्हेंबर पासून ते २३ नोव्हेंबर पर्यंत हा दौरा आहे. आज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना या दौ-याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, हा तिसरा टप्पा आहे. त्यानंतर पुढच्या चौथ्या टप्यांमध्ये आपण राहिलेला मराठवाडा, विदर्भ, कोकण असे टप्प्यात दौरे करणार आहोत.
असा आहे राज्यभर दौरा
१५ नोव्हेंबर – वाशी, परांडा, करामाळा
१६ नोव्हेंबर – दौंड, मायणी
१७ नोव्हेंबर – सांगली, कोल्हापूर, इस्मामपूर, कराड
१८ नोव्हेंबर – सातारा, मेंढा, वाई, रायगड
१९ नोव्हेंबर – रायगड, रायगड दर्शन, रायगड ते पाचाड दर्शन, मुळशी आळंदी
२० नोव्हेंबर – तुळापुर, पुणे, खराडी, चंदननगर, आळंदी, खालापुर, कल्याण
२१ नोव्हेंबर – ठाणे, पालखर, नाशिक, त्र्यंबकेश्वर
२२ नोव्हेंबर – विश्रांतगड, संगमनेर, श्रीरामपुर
२३ नोव्हेंबर – नेवासा, शेवगाव, बोधेगाव, धोंडराई, त्यानंतर अंतरवली