इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी आपली १०१ सदस्यांची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस (महामंत्री) पदी महाकिसान वृद्धी ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र अमृतकर यांची नियुक्ती झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सध्या तसेच आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेली कृषी विषयक धोरणे जनमानसात पोहचविण्यासाठी भाजप किसान मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नशील राहिल असे प्रतिपादन किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांनी केले आहे. प्रदेश कार्यकारिणीमध्ये खजिनदारपदी समीर मिश्रा मुंबई तर प्रदेश प्रसिद्धी प्रमुखपदी सोमनाथ आहेर नवी मुंबई यांचा समावेश आहे.
उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी पुढील प्रमाणे – तीन प्रदेश उपाध्यक्ष- राजेंद्र (श्याम) राजपूत नंदुरबार, पोपट (तात्या) भोळे जळगाव, बाबासाहेब डमाळे (पाटील) नाशिक. चार प्रदेश सचिव – रवींद्र थोरात अहमदनगर, संभाजी यशवंत पगारे धुळे, सोपान काका दरेकर विंचूर नाशिक, डॉ. किशोर पाटील नंदुरबार. तर उत्तर महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनी प्रमुख – बिंदूशेठ शर्मा सटाणा, सोशल मीडिया प्रशांत पाटील धुळे, कृषी पदवीधर विभाग अनिकेत सोनवणे बागलाण नाशिक,
सहा प्रदेश कार्यकारिणी सदस्य – संपत नागरे नाशिक, रमेश पिंपळे अहमदनगर, सुरेश धनके जळगांव, दीपक नरवडे चौंभूत पारनेर अहमदनगर, प्रदीप – मोतीलाल सोनवणे देवळा नाशिक, शिवशाहीर सुनील चिंचोलीकर नेवासा अहमदनगर.