इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क-
‘विश्वचषक २०२३’ मध्ये खेळलेल्या ७ साखळी सामन्यांपैकी ज्या इंग्लंड संघाला अवघा एक सामना जिंकता आला होता त्या इंग्लंडच्या पदरात आज नेदरलँड विरुद्धच्या विजयाने आणखी २ गुणांची भर पडली. आज इंग्लंडने नेदरलँडचा १६० धावांनी पराभव केला.
साखळी सामन्यात याआधी फक्त श्रीलंकेच्या संघाविरुद्ध इंग्लंडला एकमेव विजयाची नोंद करता आली होती आणि त्यामुळे गुण तक्त्यात त्यांच्या नावासमोर अवघे २ गुण होते. आजच्या या विजयाने दोनाचे चार हात करण्यात जरी इंग्लंडला यश आले असले तरी, गत विश्वविजेत्या इंग्लंड संघाचे या विश्वचषकातील आव्हान आधीच संपुष्टात आलेले आहे.
आज पुण्यातल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इंग्लंड तर्फे बेन स्टोक्सने ८४ धावात १०८ धावांची शतकी खेळी करून आणि त्याला डेव्हिड मालानने ७४ चेंडूत ८७ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडची फलंदाजी पुन्हा अडखळली होती परंतु आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन क्रिस वोक्सने अर्धशतकीय खेळी केल्यामुळे ५० षटकात ९ बाद ३३९ अशी एक आव्हानात्मक धावसंख्या इंग्लंडला उभी करता आली. नेदरलँडच्या सर्वच गोलंदाजांची आज चांगली धुलाई झाली. या धावसंख्येचा पाठलाग करताना नेदरलँड ची टीम अवघ्या ३७.२ षटकात १७९ धावांमध्ये गुंडाळली गेली. आज हा सामना संपल्यानंतर विश्वचषक २०२३ मध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचे प्रत्येकी ८ सामने खेळून झाले असून आता फक्त प्रत्येकाचा शेवटचा सामना उरला आहे. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांचे सेमी फायनल मधील प्रवेश निश्चित झाले असून आता चौथ्या क्रमांकासाठी न्युझीलँड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस निर्माण बघायला मिळेल
गुरुवारपासून चैतन्यमयी दिवाळीला प्रारंभ! असे आहेत मुहुर्त आणि महत्व
येत्या गुरुवारपासून (९ नोव्हेंबर) दिवाळीच्या उत्सवाला प्रारंभ होत आहे. अतिशय चैतन्यमयी आणि मंगल अशा या उत्सवाची जणू वर्षभर वाट पाहिली जाते. यंदाच्या दिवाळीचे मुहुर्त, महत्त्व आणि विशेष आपण आता जाणून घेऊया…