नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तालुक्यातील चिंचविहीर तांडा येथे तीन अल्पवयीन मुली केटी वेअर बंधा-यावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळेस त्यांचा पाय घसरल्याने तीन्ही पाण्यात बुडाल्या. या सर्वांना रुग्णालयात दाखल केले असता यातील दोन्ही मैत्रीणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत पुजा अशोक जाधव (१६).,खुशी देवा भालेराव (१६) या मृत झाल्या तर कावेरी देवा भालेराव (१८) हिला पुढील उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नांदगाव पोलीस स्थानकात मृत पुजाचे वडील अशोक पंडीत जाधव यांनी या घटनेची माहिती दिली. पुजा व खुशी या दोन्ही मैत्रीणी होत्या. त्या बरोबर गेल्या. त्यांच्याबरोबर खुशीची बहिण कावेरी सुध्दा गेली. त्यात ही दुर्घटना घडली. केटीवेअर बंधा-यात पाय घसरल्याने झालेल्या या घटनेत गावात शोककळा पसरली आहे.
अशी घडली घटना
केटीवेअर बंधा-यात अगोदर एक मुलगी पडली व त्यानंतर दोन्ही वाचवण्यासाठी गेल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच गावकरी धावत आले. त्यांनी या मुलींना बाहरे काढले. पण, त्यात दोन्हींचा मृत्यू झाला.