सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एम.बी.बी.एस परीक्षा केंद्रावर अनावधानाने अगोदरच उघडली प्रश्नपत्रिका…..आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नंतर बघा काय केले

by India Darpan
नोव्हेंबर 8, 2023 | 5:54 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
medical univercity

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनावधानाने अगोदरच उघडण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेसाठी विद्यापीठाकडून तातडीने उपाययोजन करण्यात आली आहे. या अनुषंगाने विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी-२०२३ सत्राच्या लेखी परीक्षा २८ ऑक्टोबर २०२३ ते ८ नोव्हेंबर २०२३ कालावधीत घेण्यात येत आहेत. राज्यभरातील पन्नास परीक्षा केंद्रावर या परीक्षा सुरु आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की, ६ नोव्हेंबर २०२३ रोजी एका परीक्षाकेंद्रावर अनवधानाने एम.बी.बी.एस-२०१९ च्या अभ्यासक्रमाच्या बायोकेमिस्ट्री भाग एक विषयाऐवजी बायोकेमिस्ट्री भाग दोनची विषयाची प्रश्नपत्रिकेचा बॉक्स उघडण्यात आला. बायोकेमिस्ट्री भाग दोनची विषयाची परीक्षेचे आयोजन ८ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. सदर बाब लक्षात येता विद्यापीठाने तातडीने उपाययोजना केली. कुलगुरु यांच्या आदेशानुसार राज्यातील ५० परीक्षाकेंद्रावर बायोकेमिस्ट्री भाग दोन विषयाचा दुसरी प्रश्नपत्रिका विद्यापीठामार्फत पुरविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

तातडीच्या प्रश्नपत्रिका बदलण्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रसंग टाळण्यात आला. परीक्षा प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ नयेत तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाकडून तत्परतेने कार्यवाही करण्यात आली होती. एम.बी.बी.एस-२०१९ च्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेकरीता राज्यभरातील एकूण ८३९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सदर परीक्षा केंद्रावर घडलेल्या घटनेबाबत विद्यापीठामार्फत चौकशी करण्यात येत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संगमनेरला कारागृहाचे गज कापून चार कैद्यांचे पलायन

Next Post

या कारागृहातील सुभेदारासह तिघे एसीबीच्या जाळ्यात…कैद्याला भेटू देण्यासाठी दोन हजारांची लाच भोवली

Next Post
IMG 20231108 WA0241

या कारागृहातील सुभेदारासह तिघे एसीबीच्या जाळ्यात…कैद्याला भेटू देण्यासाठी दोन हजारांची लाच भोवली

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011