बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जल दिवाळी..मोहिमेच्या पहिला दिवशी देशभरातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…इतक्या महिलांनी घेतला सहभाग

by India Darpan
नोव्हेंबर 8, 2023 | 1:16 pm
in राष्ट्रीय
0
image0013N26

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) आणि ओडिशा अर्बन अकादमी, यांच्या सहकार्याने, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) अमृत- (AMRUT) योजनेअंतर्गत आयोजित केलेला “महिलांसाठी पाणी,पाण्यासाठी महिला”या मोहिमेचा उदघाटनाचा पहिला दिवस ७ नोव्हेंबर यशस्वीपणे उत्साहात साजरा झाला. ही मोहीम काल ७ नोव्हेंबर रोजी सुरू झाली, असून ती ९ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.

“महिलांसाठी पाणी,पाण्यासाठी महिला” या मोहिमेचा उद्देश जलप्रशासनात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. या उपक्रमादरम्यान त्यांना त्यांच्या संबंधित शहरांमधील जलशुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पांना (WTPs) भेटी देऊन जलशुद्धीकरण प्रक्रियेचे प्राथमिक ज्ञान दिले जाईल.

दरम्यान सर्व राज्यांमधून (निवडणूक असलेली राज्ये वगळता) ४१०० हून अधिक महिलांनी या मोहिमेत आपला सहभाग घेऊन मोहिमेचा पहिला दिवस “जल दिवाळी”हा उत्साहात साजरा झाला. घरांमध्ये स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचवण्याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे अमूल्य प्रत्यक्ष ज्ञान मिळवण्यासाठी या सशक्त मोहीमेद्वारे महिलांनी देशभरातील २५० हून अधिक जलशुद्धीकरण प्रकल्पांना (WTPs) भेटी दिल्या. राज्य अधिकार्‍यांनी स्वयं-सहायता गटांच्या महिलांचे फुलांनी स्वागत केले आणि त्यांना पाण्याच्या बाटल्या/सिपर/चष्मा, पर्यावरण पूरक पिशव्या,बिल्ले या वस्तूंसह भेटसामुग्री देण्यात आली.

दिवसभर, महिला पाण्याच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधा जाणून घेण्यात मग्न होत्या, त्यांच्या समुदायासाठी पाण्याच्या शुद्धतेचे सर्वोच्च मानक सुनिश्चित करणाऱ्या पाणी गुणवत्ता चाचणी मानदंडांवर तज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त करत होत्या.पाण्याच्या पायाभूत सुविधांबद्दल सहभागी महिलांना
मालकी आणि जबाबदारीची सखोल जाणीव करून देत महिलांना ज्ञानाद्वारे सक्षम बनवण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट अशाप्रकारे साध्य झाले.

अमृत (AMRUT) योजनेच्या विस्ताराचा महिलांना परिचय करून देणे आणि त्याबद्दल माहिती देणे,जल शुद्धीकरण प्रकल्प संयंत्रांना भेटी देऊन त्यांचे सांगोपांग ज्ञान प्रदान करणे, महिला स्वयं-सहायता गटांनी (SHGs) तयार केलेल्या स्मृतीचिन्ह आणि लेखांद्वारे त्यातील सर्वसमावेशकतेला चालना आणि प्रोत्साहन देणे, घरांमधून कार्यक्षम पाणी साठवणूक करण्याच्या वस्तूंचा अवलंब करणे,यावर पहिल्या दिवशी लक्ष केंद्रित केले होते. जलस्रोतांचे संवर्धन आणि सूज्ञपणे वापर करण्यासाठी आणि विचारपूर्वक कृती आणि विवेकपूर्ण निर्णय घेऊन या अमूल्य स्रोतांचे संरक्षण करण्यासाठी सहभागी महिलांनी संकल्प केला.

पायाभूत सुविधांच्या गहन क्षेत्रात समावेशकता आणि सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत स्वयं सहाय्यता गट आणि राज्यातील अधिकार्‍यांच्या प्रयत्नांनी अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील मोहिमेचा पहिला दिवस यशस्वी झाला. ही मोहीम ९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून या जल मोहिमेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ४०० हून अधिक जलशुद्धीकरण प्रकल्पांना भेटी देत, दहा हजाराहून अधिक स्वयं सहाय्यता गटांच्या महिलांच्या अधिकाधिक सहभागासह “जल दिवाळी” साजरी करण्यासाठी एकत्र येण्याची अपेक्षा आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक घटना! चार वर्षीय मुलांचे अपहरण…उसाच्या शेतात गोणी टाकून फेकून दिले.. असा झाला गुन्ह्याचा उलगडा (बघा व्हिडिओ)

Next Post

नवीन जामनेर रेल्वे स्थानकाची जागा शहराजवळ आणण्याचा प्रस्ताव

India Darpan

Next Post
download 2023 11 08T135346.444

नवीन जामनेर रेल्वे स्थानकाची जागा शहराजवळ आणण्याचा प्रस्ताव

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011