नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या वातीने आणि नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने नाशिकच्या छत्रपती शिवाजी जिल्हा क्रीडा संकुल येथील कॅरम हॉलमध्ये नाशिक महानगर परिसरीतील शाळांच्या १४ वर्षे मुले आणि मुली यांच्या आंतर शालेय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलांमध्ये जु. स. रुंगठा हायस्कूलचा श्रीराज युवराज कुमावत याने उंटवडीच्या इंग्लिश मिडियम शाळेच्या नैतिक पवारचा २-० असा पराभव करून यअ गटाचे विजेतेपद मिळविले. नाशिकच्या मालतीबाकुलकर्णी शाळेच्या आर्यन उमाळे याने तिसरा, सोहम पवारने चवथा, मयूरेश फुगरेने पाचवा तर वेदान्त क्षीरसागर याने सहावा क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत पुष्पवाती रुंगठा शाळेची खेळाडू चैत्राली वटाणे हीने आपल्याच शाळेच्या प्राची मनवरला २-१ असे पराभूत करून विजेतेपद मिळविले.
र. ज. चव्हाण नाशिकरोड शाळेची तनुजा गाढवेने तिसरा, जे. एम. सी. टी. च्या खेळाडू इरका जुनेद खतीब आणि भूशरा कोंकणी यानी अनुक्रमे चवथा आणि पाचवा तर क्रमांक लॉरेन्स शाळेची जान्हवी चव्हाण हीने सहावा क्रमांक मिळविळा. या स्पर्धेत मुलांमध्ये तर मुलांमध्ये १०९ खेळाडूनी तर मुलीमध्ये ६७ खेळाडूनी सहभाग घेतला. यअ स्पर्धाला छत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अविनाश खैरनार, जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक नितीन हिंगमिरे आणि शशांक वझे यांनी भेट देवून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला. उद्या १७ वर्षे मुले आणि मुली या वयोगटांच्या स्पर्धा होणार असून दिनांक २१ सप्टेंबेर रोजी १९ वर्षे गटाच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी महेश पाटील, जिल्हा कॅरम असोसिएशनचे आनंद खरे यांच्या मार्गदर्शनाखाली, भूषण भटाटे, ओम विभांडीक, नकुल चावरे, यश अहिरे, उत्कर्ष परदेशी, शाळेचे क्रीडा शिक्षक उदार मॅडम, भरत खत्री, यशवंत ठोके, महिंद्र साळवे, प्रणव अहिरे, अंकुर गरुड आदिनी परिश्रम घेतले.