इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – पॉर्नोग्राफी सिनेमांचे चित्रीकरण आणि लाईव्ह-स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी तीन जणांना गजाआड करण्यात आले आहे. पिहू नावाच्या आधारित ॲपवर पोर्नोग्राफिक सिनेमे प्रदर्शित करण्यात येत होते. पिहू या प्लॅटफॉर्मवरील व्हिडीओ पाहण्यासाठी निर्माते दर महिन्याला युजर्सकडून पैसे घेत होते.
वर्सोवा पोलिसांनी २० आणि ३४ वयोगटातील दोन महिला आणि २७ वयोगटातील एक पुरुषाला अटक केली आहे. ते पिहू या प्लॅटफॉर्म अश्लिल व्हिडीओ अपलोड करत होते. ते महिलांसोबत व्हिडीओ, ऑडीओ कॉलवर बोलत होते. अंधेरी पश्चिम येथून पॉर्नोग्राफी व्हिडीओ शूट होत होते. अंधेरी पश्चिम येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या शूटिंगबद्दल पोलिसांनी छापा टाकला.
इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्ट्रीमिंग शेड्यूलची माहिती युजर्सना मिळायची. यासाठी युजर्सना ॲपमधील काही कॉईन्स खरेदी करावी लागत होती. ॲपवर प्रोफाईल असलेल्या युजर्सना महिलांकडून ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलसारख्या सेवा मिळत होत्या. या ॲपसाठी महिला स्वेच्छेने काम करत होत्या, की त्यांना अस काम करण्यास भाग पाडले जात होते, याची चौकशी केली जात आहे..