इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर- एखाद्याचा राग कोणत्या कारणासाठी अनावर होईल, हे सांगता येत नाही. रागावर नियंत्रण नसले, की माणूस विवेक गमावून बसतो, याचे प्रत्यंतर नागपूरमध्ये आले. एका डॉक्टरला चहा, बिस्किट मिळाले नाही, म्हणून शस्त्रक्रिया सोडून निघून गेले. आता या प्रकारावर सध्या संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोंग्य केंद्रात ऑपरेशनची सर्व तयारी झाली होती. तसेच रुग्णांना अॅनेस्थिशिया देण्यात आला होता. शस्त्रक्रिया नियोजित होती. त्यानुसार सर्व तयारी करण्यात आली होती. चार महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यासाठी डॉक्टर आरोग्य केंद्रात वेळेवर आले; परंतु त्यांना त्यांना वेळेत चहा बिस्किटे मिळालली नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रिया न करताच डॉक्टर आरोग्य केंद्रातून निघून गेले.
डॉक्टरांच्या या कृत्याचा नाहक त्रास चार महिला रुग्णांना सहन करावा लागला. रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी कुंदा राऊत यांची संबंधित डॉक्टरांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. डॉक्टर भलावी यांना शुगरचा त्रास आहे. त्यांना चहा, बिस्कीटची गरज होती. ती न मिळाल्याने ते तिथून निघून गेले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दुसऱ्या डॉक्टरची व्यवस्था करून नियोजित शस्त्रक्रिया केली.