इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देश विदेशातून यंदा आलेल्या सुमारे ५५ लाख भाविकांनी देवभुमी उत्तराखंडची चारधाम यात्रा पुर्ण केली. या यात्रेने आता पर्यंतचे सर्व रेकॅार्ड मोडले असून नवा उच्चांक प्रस्थापित केला. यात महाराष्र्टातील पर्यटकांची संख्या सर्वाधिक होती. मात्र पुढील वर्षी अधिकाधिक भाविकांनी चारधाम यात्रेसाठी यावे व त्यासाठी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रीयन गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करावी यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री.पुष्करसिंह धामी यांनी हॅाटेल ताज मुंबई येथे ग्लोबल समीटचे आयोजन केले होते.
तथापी यंदा चारधाम यात्रेतील भाविकांना केदारनाथ येथे ओनलाईन हेलिकॅाप्टर तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड त्रास झाला. तसेच अनेक भाविकांना इच्छा असूनही हेलिकॅाप्टर सेवेचा लाभ घेता आला नाही. या परीस्थितीचा गैरफायदा डोलीवाले व घोडावाले यांनी घेऊन यात्रेककडून जास्त पैसे घेतले. तसेच घोड्यांकडून अतीश्रम करवून घेतल्याने काही घोड्यांना जीव गमवावा लागला.
याबाबत सदर समिटमधे महाराष्र्ट चेंबर्स ओफ कॅामर्सचे टुरीझम कमेटिचे को चेयरमन तथा महाराष्र्ट टुर ओपरेटर्स असोसिएशनचे सेक्रेटरी दत्ता भालेराव यांनी निवेदन दिले तसेच याबाबत काही महत्वपुर्ण उपायही सुचवले. याप्रसंगी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, वरीष्ठ उपाध्यक्ष अनिलजी लोढा, उपाध्यक्ष कांतीलालजी बाफना, जीसी मेंबर राजाराम सांगळे, सचिन शहा, भावेश माणेक, संगिता पाटिल, अंजु सिंगल, राजेंद्र शिरोडे इ. उपस्थित होते.