इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बिनधास्त बोलत असतात. पण, आज त्यांनी माध्यमांशी बोलतांना एका हळव्या विषयावर कबुली दिली. त्यांचे मोठे विधान मात्र चांगलेच चर्चेचे ठरले. लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुनेत्रा पवारांना रिंगणात उतरवणं ही मोठी चूक झाल्याचे त्यांनी सांगितले. बहीण सुप्रियाविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करायला नको होतं. आज माझं मन मला सांगतं. तसं व्हायला नको होतं. रक्षाबंधनाच्यावेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरुर जाणार, असे ते म्हणाले.
दरम्यान पत्रकारांनी अजित पवार यांच्या विधानावर खासदार सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्या म्हणाल्या आपण अजून हे वक्तव्य पाहिलेले नाही. त्याविषयीची अधिकृत माहिती आपल्याकडे नाही असे सांगत त्यांनी जास्त बोलणे टाळले. तर काँग्रेसमने अजितदादांना हळूहळू सर्व चुकांची जाणीव होईल, असा टोला लगावला.
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतांना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. लाडकी बहिण योजना जाहीर केल्यानंतर बारामतीच्या विषयांवरुन त्यांच्यावर टीका झाली. त्यावेळेस बहिण आठवली नाही का असा प्रश्नही केला जात होता. त्यानंतर आज अजित पवार यांनी ही कबूली दिल्यामुळे ती चर्चेची ठरली.