नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बनावट दस्तऐवज तयार करून पोटच्या मुलीने पित्याची सहमती न घेता आईच्या नावे असलेली मिळकत परस्पर आपल्या नावे करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवीगाळ करीत आत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. वडिलांनी न्यायालयात धाव घेतल्याने याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्चना संजिवन खराडे, संजिवन प्रकाश खराडे, विश्वेष संजिवन खराडे (रा.तिघे त्रिमुर्ती चौक,सिडको) व संजय तुळशीराम गाडेकर (रा.गाडेकरमळा,सिन्नरफाटा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे. याबाबत लक्ष्मण हरिभाऊ गांगुर्डे (६६ रा.सामनगाव रोड सिन्नरफाटा) यांनी फिर्याद दिली आहे.
लक्ष्मण गांगुर्डे व अर्चना खराडे बापलेक असून गांगुर्डे यांच्या मालकिची महानगर पालिका हद्दीतील देवळाली गाव शिवारात सर्र्व्हे नं.२१७ मध्ये शेतजमिन आहे. एकुण क्षेत्र हे ००.२७ आर यासी आकार रूपये १.७५ पैसे या क्षेत्रापैकी फिर्यादी यांच्या पत्नीच्या हिस्याची क्षेत्र हे.००.०२ आर हेत्र हे संशयित मुलगी अर्चना खराडे हिने सन.२०२१ मध्ये उवर्रीत संशयितांशी संगनमत करून व बनावट दस्तऐवज तयार करून गांगुर्डे यांच्या पत्नीच्या नावे असलेली मिळकत परस्पर स्व:ताच्या नावे करून फसवणुक केली.
याबाबत आत्या रेखा हरिभाऊ गांगुर्डे यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयित मुलीने आपल्या आत्यास शिवीगाळ व मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने पित्याने न्यायालयात धाव घेतली होती. कोर्टाच्या आदेशाने संबधीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सुनिल बिडकर करीत आहेत.
……..