इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरः महाराष्ट्रात मागच्या निवडणुकीतही ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळवलेल्या भारत राष्ट्र समितीने या वेळी दहा ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली. विशेष म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा विदर्भात काँग्रेसला फटका बसला.
विदर्भात केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीने चांगलेच यश मिळवले आहे. या पक्षाने काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भंडारा जिल्ह्यात बीआरएसने चांगली कामगिरी केली आहे. राव यांनी मराठवाडा आणि विदर्भात सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. राव यांच्या सभानंतरची ही पहिलीच निवडणूक होती.
बीआरएसचा फटका काँग्रेसला बसला आहे; परंतु भविष्यात भाजपसाठीही हा पक्ष धोक्याची घंटा होऊ शकतो. याबाबच चरण वाघमारे म्हणाले, की राज्य सरकारने विकास केवळ टीव्ही आणि मीडियाच्या माध्यमातून केला आहे. प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलला विकास झालेला नाही. आम्ही ग्राऊंड लेव्हला प्रचंड काम केले आहे. त्यामुळे मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकाला आहे.