नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – किरकोळ कारणातून दोघा नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाले. एकाने कारने धडक देत दुचाकीस्वारास कमरेच्या पट्यांने बेदम मारहाण केली. तर दुस-याने कार अडवित वीट मारून फेकल्याने चालक जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (दि.११) दुपारी पेठेनगर रोड भागात झाल्याचे नमुद करण्यात आले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली फिर्याद सतिष सत्यप्रकाश चव्हाण (५४ रा.आनंदवली,गंगापूररोड) यांनी दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की. नातेवाईक असलेल्या वरून परमार याने पेठेरोडनगर रोडने कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. संशयिताने कार अडवून मोबाईवर मॅसेज केल्याच्या रागातून कार अडवित शिवीगाळ करून हातातील वीट मारून फेकली. या घटनेत चव्हाण यांच्या कपाळास दुखापत झाली आहे.
दुसरी फिर्याद वरूण दिलीप परमार (अमित टॉवर पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. परमार रविवारी दुपारच्या सुमारास पेठेनगर रोडने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना क्लपतरू हार्डवेअर दुकानाजवळ कारमधून आलेल्या संशयित नातेवाईकाने दुचाकीस धडक दिली. यावेळी खाली उतरून संशयिताने फोन करण्याच्या कारणावरून कुरापत काढत कमरेच्या बेल्टने मारहाण करून दुखापत केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले असून या घटनेत जीवे ठार मारण्याची धमकी देत संशयिताने दुचाकीचे व मोबाईलचे नुकसान केले असल्याचे म्हटले आहे. याबाबत परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हलालदार ढवळे व जाधव करीत आहेत.