इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या तिकीट वाटपाचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. रविवारी झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली. त्याचबरोबर मित्रपक्षांना कोणत्या आणि किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे.
भाजप प्रदेश कार्यालयात कोअर कमिटीची बैठक रविवारी पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभा प्रभारी भूपेद्र यादव, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे उपस्थितीत होते. विधानसभा निवडणुकीसंदर्भातील तयारी, आढावा आणि नियोजन या बैठकीत ठरले आहे.
दरम्यान भाजप १५० जागांवर लढणार असून १३८ जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार असल्याचेही या बैठकीत ठरल्याचे बोलले जात आहे.