गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नागपुरातील मेफेड्रोन कारखान्याचा पर्दाफाश…७८ कोटीचे मेफेड्रोन जप्त

by India Darpan
ऑगस्ट 11, 2024 | 11:41 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 35

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल गुप्तचर संचालनालयाने शनिवारी 10 ऑगस्ट 2024 रोजी नागपुरातील मेफेड्रोन कारखान्याचा पर्दाफाश केला. नागपूर शहरातील पाचपावली परिसरात एका बांधकामाधीन इमारतीत गुप्तरित्या मेफेड्रोनचे उत्पादन सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय युनिटला मिळाली होती. या विशिष्ट माहितीच्या आधारे 10 ऑगस्ट 2024 रोजी एक सुसंघटित शोध मोहीम राबविण्यात आली. मेफेड्रोनच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेली सर्व रसायने, साहित्य आणि यंत्रसामग्रीने सुसज्ज एक छोटी प्रयोगशाळा या इमारतीत उभारण्यात आल्याचे या शोध मोहिमेत आढळून आले.

या कटाच्या म्होरक्याने प्रथम यंत्रसामग्रीचा संपूर्ण संच खरेदी केला आणि प्रयोगशाळा उभारली तसेच 100 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार करण्याची क्षमता असलेला कच्चा माल देखील जमा केला.

या टोळीने आधीच द्रव स्वरूपातील 50 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार केले होते आणि क्रिस्टलाइज्ड अथवा पावडर स्वरूपातील उत्पादन तयार करण्यासाठी त्यावर पुढील प्रक्रिया सुरू होती. सुमारे 78 कोटी रुपये किमतीचे 51.95 किलो मेफेड्रोन द्रव स्वरूपात जप्त करण्यात आले असून यासोबत कच्चा माल आणि उपकरणे देखील जप्त करण्यात आली आहेत. अमली पदार्थ आणि सायकोट्रोपिक म्हणजेच मनावर नकारात्मक परिणाम करणारे पदार्थ (NDPS) कायदा, 1985 अंतर्गत मेफेड्रोन हा मनावर नकारात्मक परिणाम करणारा पदार्थ आहे.

या टोळीचा म्होरक्या किंवा भांडवलदार आणि मेफेड्रोन उत्पादनात गुंतलेल्या त्याच्या तीन साथीदारांना अमली पदार्थ आणि सायकोट्रोपिक म्हणजेच मनावर नकारात्मक परिणाम करणारे पदार्थ (NDPS) कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील चौकशीसाठी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. या मोहिमेत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या चमूला नागपूर पोलिसांचेही सहकार्य मिळाले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

अंमली पदार्थांच्या तस्करी जाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी जटिल मोहीमा हाती घेण्याच्या आणि त्या यशस्वी करण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या क्षमतेला ही मोहीम आणखी बळकटी प्रदान करते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रती हेक्टरी ५ हजारांचे अनुदान; कृषिमंत्री धनंजय मुंडे

Next Post

NEET PG 2024 परीक्षेचे देशभरातील १७० शहरांमध्ये आयोजन…या होत्या उच्च दर्जाच्या सुरक्षा उपाययोजना

Next Post
Untitled 78

NEET PG 2024 परीक्षेचे देशभरातील १७० शहरांमध्ये आयोजन…या होत्या उच्च दर्जाच्या सुरक्षा उपाययोजना

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011