इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हिंडेनबर्ग रिसर्च एलएलसीने व्हिसब्लोअर कागदपत्रांचा हवाला देत १० ऑगस्ट २०२४ प्रकाशित केलेल्या नवीन अहवालात सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांचा अदानी मनी फॅानिंग स्कॅटल म्हणून वापरल्या गेलेल्या दोन ऑफशोर फंडामध्ये हिस्सा असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर अदानी समुहाने हे सर्व आरोप फेटाळले आहे.
हिंडनबर्ग रिसर्चच्या ताज्या अहवालावर अदानी समूहाने त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळले आहे. समूहाने म्हटले की, हिंडेनबर्गचे नवीनतम आरोप हे तथ्य आणि कायद्याकडे दुर्लक्ष करून वैयक्तिक नफाखोरीसाठी पूर्व-निर्धारित निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीची दुर्भावनापूर्ण, खोडकर आणि फेरफार करणारे आहेत. आम्ही अदानी समूहावरील हे आरोप पूर्णपणे नाकारतो जे पूर्णपणे तपासले गेलेले, निराधार असल्याचे सिद्ध झालेले आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०२४ मध्ये फेटाळून लावलेल्या बदनाम दाव्यांचे पुनर्वापर आहेत.