इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मनसेच्या कार्यकर्त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या ताफ्यातील कारवर हल्ला करण्यात आला. यावेळी मनसैनिकांकडून कारवर शेण फेकण्यात आले. ठाण्यात भगवा सप्ताह मेळाव्याला जात असतांना ही घटना घडली. दोन दिवसापूर्वी बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर सुपा-या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर मनसेने उध्दव ठाकरे या ताफा जात असतांना गाडीवर शेण फेकले. या ताफ्यावर बांगड्या व टोमॅटोही फेकण्यात आले. यावेळी फुगेही फेकण्यात आले. या घटनेत तीन ते चार गाड्यांचे नुकसान झाले आहे.
ठाण्यात सभास्थळी मनसैनिक थेट सभागृहात घुसले. जवळपास ५० ते ६० मनसैनिक यावेळी होते. त्यांनी आंदोलनही केले. काहीवेळी पूर्वी मुस्लीम समाजाने मातोश्रीबाहेर आंदोलन सुरु केले होते. त्यावेळी तणाव वाढला होता.