नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कटरचा धाक दाखवत स्कोडाकारमधून आलेल्या तस्करांना कारखाना आवारातील चंदनाचे झाड कापून नेले. ही घटना औद्योगीक वसाहतीतील महिद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीत घडली. या घटनेने कारखान्याचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश उखासिंह परदेशी (रा.आनंदनगर,पाथर्डी फाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. परदेशी महिंद्रा कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेत कार्यरत असून गेल्या सोमवारी (दि.५) ते सेवा बजावत असतांना ही घटना घडली. स्कोडा कार आणि दुचाकींवर तोंडबांधून आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने कारखाना आवारात प्रवेश केला.
ही बाब निदर्शनास येताच परदेशी यांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी कटर मशिनचा धाक दाखवित आवारातील सुमारे ४० हजार रूपये किमतीचा चंदनाच्या झाडाचा बुंधा कापून नेला. अधिक तपास हवालदार दीपक खरपडे करीत आहेत.