मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वैनगंगा-नळगंगा पाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे. या मंजूरीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांचे आभार मानले आहे.
या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून १०.६४ टीएमसी पाणीवापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ४९,५१६ हेक्टर क्षेत्राला होणार आहे. सुमारे ७०१५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.
काय आहे नार – पार गिरणा नदीजोड प्रकल्प
या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा तालुक्यातील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची ही योजना आहे. यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव या तालुक्यांना तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, अमळनेर, धरणगाव या तालुक्यातील सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. धुळे जिल्हयातील काही भागात त्याचा फायदा होणार आहे.