इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक – बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने लघूशंका करण्याचा बहाणा करत पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी गंगापूर रोडवरील विसे मळा भागात ही घटना घडली. हा आरोपी पळून गेल्यानंतर पोलीसांनी त्याचा सर्वत्र शोध सुरु केला. पण, संशयित हाती न लागल्याने दिडोरी पोलीसांनी सरकारवाडा पोलीसात धाव घेतली असून उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार पिंपळणारे, ता. दिंडोरी येथील ३५ वर्षीय संशयितास दिंडोरी पोलीसानी बलात्काराच्या गुन्हात अटक केली आहे. न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयिताने पीडित तरुणीला त्र्यंबकेश्वर परिसरातील अंजनेरी परिसरात आणून तरुणीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यास अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली होती.
गुन्ह्याच्या अधिक तपासाठी दिंडोरी पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यानी त्यास गुरुवारी (दि.२८) त्र्यंबकेश्वर परिसरात नेले होते. तेथून ते परतीच्या प्रवासाला निघाले असता ही घटना घडली. सर्व जण शासकीय वाहनाने गंगापूर रोडवरील विसे मळा भागातून प्रवास करीत असताना संशयिताने लघूशंकेचा बहाणा केला. त्यानंतर एक पोलीस व सशयीत रोडच्या दुसर्या बाजूला दुभाजक ओलांडून गेले. ही संधी साधत सशयीताने पोलिसाच्या हाताला झटका देवून पोबारा केला.. पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र तो अंधाराचा फायद घेत पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.