नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – युवा वर्गाला रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात आठ शिकाऊ प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते सहा महिन्यासाठीचे नियुक्ती आदेश देण्यात आले.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणात कामकाज शिकून घ्यावे. तसेच भविष्यासाठी विविध कौशल्य देखील आत्मसात करावे. येथे अवगत होणारी कामकाज करण्याची पद्धत, कौशल्य या प्रशिक्षणार्थीना भविष्यात नवीन रोजगारासाठी नक्कीच उपयोगी ठरेल. या मोलाच्या मार्गदर्शनासह डॉ. गेडाम यांनी निवड झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.
या प्रशिक्षणार्थीची झाली निवड
धनश्री प्रकाश गुजांळ
तेजश्री दिपक सातपुते
संदीप अशोक नागरगोजे
अदित्य जयंत देवरे
अनिकेत विजय उशिरे
रूपेश विश्वनाथ शिंदे
संतोष वसंत नेटावरे
जितेंद्र अंबादास जाधव
निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींचा कार्य प्रशिक्षण कालावधी हा रुजु झाल्यानंतर ६ महिने राहील. विद्यावेतन शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार, आठ हजार, दहा हजार हे ऑनलाईनद्वारे आपल्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये DBT व्दारे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांचे मार्फत अदा करण्यात येईल.