नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे मंत्रालयाच्या आठ (८) प्रकल्पांना मंजूरी दिली असून, यासाठी एकूण रु. २४,६५७ कोटी (अंदाजे) खर्च अपेक्षित.
८ (आठ) प्रकल्पांमध्ये सात राज्यांमधील १४ जिल्ह्यांचा समावेश. यामध्ये महाराष्ट्रातील जालना-जळगाव- १७४ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासह, ओदिशा, आंध्र प्रदेश, झारखंड, बिहार, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील प्रकल्पांचा समावेश. यामुळे भारतीय रेल्वेच्या सध्याच्या नेटवर्क मध्ये (जाळ्यात) ९०० किलोमीटर ची भर पडणार.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेल्या ‘अजिंठा लेणी’, भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडल्या जाणार, या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देणाऱ्या पर्यटकांची सोय होणार.