इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
झी मराठी पुरस्कार सोहळ्यात तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिकेबरोबरच तब्बल १० पुरस्कार मिळवत वेगळा रेकॅार्ड केला आहे. या मालिकेतील जवळपास सर्वच पात्रांना पुरस्कार मिळाले आहे. पण, अक्षराच्या माहेरच्यांना एकही पारितोषिक मिळाले नाही. त्यामुळे ते नाराज झाले नाही ना असा प्रश्न आता सर्वसामान्य प्रेक्षकांना पडला आहे. अक्षराची आई, बाबा व बहिण यांनी सुध्दा या मालिकेत तितकीच महत्त्वाची भूमिका साकार केली आहे. पण, त्यांच्या वाट्याला एकही पुरस्कार आला नाही.
पण, अक्षराच्या सासरच्या मंडळीच्या जवळपास सर्वच लोकांना पुरस्कार मिळाला आहे. त्यात सासु भुवनेश्वरी, पती अधिपती, अधिपतीची आजी व अक्षराला पुरस्कार मिळाले आहे. खरं तर ही मालिका भुवनेश्वरीमुळे हिट झाली असे बोलले जात असले तरी या मालिकेत अधिपती, अक्षरा बरोबरच इतरांच्या भूमिका तितक्यात महत्त्वाच्या आहे. त्यामुळे अक्षराच्या माहरेच्यावर झालेला अन्याय ती घेईल का …असा भोळ्या प्रेक्षकांना पडला तर त्यात नवल नाही.
काहीही असो पण, या मालिकेने बघा इतके पुरस्कार मिळवले आहे.
सर्वोत्कृष्ट मालिका – तुला शिकवीन चांगलाच धडा
सर्वोत्कृष्ट नायक – अधिपती (तुला शिकवीन चांगलाच धडा)
सर्वोत्कृष्ट नायिका – अक्षरा (तुला शिकवीन चांगलाच धडा)
सर्वोत्कृष्ट जोडी – अक्षरा-अधिपती (तुला शिकवीन चांगलाच धडा)
सर्वोत्कृष्ट जावई – अधिपती ( तुला शिकवीन चांगलाच धडा)
सर्वोत्कृष्ट खलनायिका – भुवनेश्वरी (तुला शिकवीन चांगलाच धडा )
सर्वोत्कृष्ट विनोदी पुरुष – फुलपगारे सर ( तुला शिकवीन चांगलाच धडा)
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री – भुवनेश्वरी ( तुला शिकवीन चांगलाच धडा)
सर्वोत्कृष्ट आजी – अधिपतीची आजी ( तुला शिकवीन चांगलाच धडा)
विशेष लक्षवेधी चेहरा – अक्षरा ( तुला शिकवीन चांगलाच धडा)